Manasvi Choudhary
दररोज सकाळी योगा करणे शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आहे. शरीराचे रक्ताभिसरण सुधारते आणि मन प्रसन्न राहते.
मान गोलाकार फिरवणे, खांदे फिरवणे आणि कंबरेतून वाकून थोडे स्ट्रेचिंग करणे यामुळे पाठीला बाक येत नाही.
किमान ३ ते ५ वेळा सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कारमध्ये १२ आसने आहेत जे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी फायद्याचे आहेत.
दोन्ही हात वर करून पायांच्या चवड्यावर उभे राहा आणि संपूर्ण शरीर वरच्या दिशेला ओढा यामुळे शरीरातील आळस दूर होतो
सुखासनात बसून एका नाकपुडीने श्वास घ्या आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडा यामुळे मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो, तणाव कमी होतो
जमिनीवर शांत झोपून डोळे मिटून रिलॅक्स व्हा यामुळे शरीर शांत होते
योगासने नेहमी रिकाम्या पोटी किंवा चहा-कॉफी घेतल्याच्या किमान १ तासानंतर करावीत.