Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी केवळ जिमची गरज नाही तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करू शकता नियमितपणे ३० दिवस हे १२ व्यायाम केल्याने वजन घटण्यास मदत होईल.
१) एका बंद खोलीमध्ये ताठ उभे राहा आणि दोन्ही पाय एकत्र ठेवा.
२) आता एका जागेवर चालण्यास सुरुवात करा. डावा गुडघा वर उचला, नंतर खाली ठेवा.
३) त्यानंतर उजवा गुडघा वर उचला. ज्यावेळी डावा पाय वर असेल, तेव्हा उजवा हात पुढे आणि डावा हात मागे जाईल.
४) हात बदलून हीच कृती दोन्ही बाजूंनी करा. दररोज नियमितपणे ५ ते १० मिनिटे व्यायाम करा.
१) सरळ उभे राहून दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवा आणि हात समोर सरळ ठेवा.
२) आता हळूहळू खुर्चीवर बसल्यासारखे गुडघे वाकवून बसा
३) मांड्या जमिनीला पूर्ण समांतर न करता, साधारण ४५ अंशाच्या कोनात खाली बसा
४) या स्थितीत १-२ सेकंद थांबा आणि नंतर हळूहळू श्वास सोडत पुन्हा आहे त्या स्थितीत राहा.
१) बेंच किंवा स्टेप-बॉक्सच्या समोर उभे राहा.
२) तुमचा उजवा पाय बेंचवर ठेवा आणि डावा पाय हवेत वर उचला.
३) आता उजव्या पायावर जोर देऊन शरीराचे वजन वर घ्या आणि डावा पाय बेंचवर आणा.
४) पुन्हा हळूहळू एका-एका पायाने मूळ स्थितीत या.
१) ताठ उभे राहा आणि दोन्ही हात जमिनीला समांतर ठेवा.
२) हात खांद्यापासून १० ते १५ वेळा गोलाकार आकारात फिरवा.
३) त्यानंतर पुन्हा हात सरळ ठेवून १० ते १५ वेळा उलट दिशेने फिरवा
१) पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही गुडघे वरच्या दिशेला वाकवा
२) दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना सरळ जमिनीवर ठेवा.
३) दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा आणि पावले
४) पोटाचे स्नायू घट्ट ठेवून हळूहळू हिप्स जमिनीवरून वर उचला.
५) शरीर खांद्यापासून गुडघ्यांपर्यंत एका सरळ रेषेत आले पाहिजे. वर आल्यावर हिप्सचे स्नायू आवळून २ ते ३ सेकंद तसेच थांबा.
१) जिमिनीवर मॅटवर पालथे झोपा. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत जमिनीवर ठेवा.
२) गुडघे जमिनीवर टेकवा. पाय एकमेकांना जोडून ठेवा आणि हवेत वर उचला.
३) मान, पाठ आणि मांड्या एका सरळ रेषेत ठेवा.
४) श्वास आत घेत, कोपर वाकवून छाती जमिनीच्या दिशेने खाली न्या.
५) श्वास सोडत, हातांवर जोर देऊन पुन्हा मूळ स्थितीत या.
१)हा एकाच जागी उभे राहून धावण्याचा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे.
२) घरात कुठेही हा व्यायाम तुम्ही सहज करू शकता.
३) एरोबिक व्यायाम केल्याने कॅलरीज लवकर बर्न होतात आणि शरीराचा फॅट कमी होतो.
१) एका स्थिर खुर्चीच्या पाठीमागे उभे राहा आणि दोन्ही हातांनी खुर्चीच्या वरच्या भागाला हलके पकडा.
२) डावा पाय हळूवारपणे मागे घ्या. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीवर राहतील असे उभे राहा
३) श्वास आत घेत, दोन्ही गुडघे हळूवार ९० अंशाच्या कोनात वाकवा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि पुढचा गुडघा पायाच्या बोटांच्या पुढे जाऊ देऊ नका.
४) श्वास बाहेर सोडत, हळूहळू मूळ स्थितीत या.
५) याचप्रमाणे दुसऱ्या पायाने (उजवा पाय मागे घेऊन) हा व्यायाम करा.
१) ताठ उभे राहा आणि दोन्ही पाय जवळ ठेवा.
२) दोन्ही हात डोक्याच्या वर पूर्णपणे सरळ दिशेने ताणा.
३) श्वास सोडताना कंबरेतून हळूहळू पुढे आणि खाली वाका.
४) हात सरळ ठेवून पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
५) या पोझिशनमध्ये १५ ते ३० सेकंद थांबा.
६) श्वास घेत पुन्हा मूळ स्थितीत या.
१) जमिनीवर पोटावर झोपा.
२) दोन्ही हात कोपऱ्यात दुमडून कोपरे ठेवा आणि तळहाते जमिनीवर टेकवा.
३) गुडघे जमिनीवरच ठेवून पोटाचे स्नायू घट्ट आवळा.
४) पाठ सरळ रेषेत ठेवा. मान आणि पाठीचा कणा एका रेषेत असणे महत्वाचे आहे.
५) या स्थितीत सामान्यपणे श्वास घेत २० ते ३० सेकंद थांबा
१) सरळ उभे राहा, आपले पाय खांद्याइतके रुंद ठेवा. आपले हात चेहऱ्याच्या समोर मुठी आवळून ठेवा.
२) हवेत सिंगल जब्स , क्रॉस,आणि हुक्स मारण्याचा सराव करा.
३) केवळ पंच न मारता, काल्पनिक प्रतिस्पर्ध्यापासून बचाव करण्यासाठी डावीकडे-उजवीकडे वाकणे आणि मागे सरकणे यांसारख्या हालचाली करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.