Dhanshri Shintre
पावसाळ्यात अनेक प्रवासी गर्दीपासून दूर असलेली ऑफबीट हिल स्टेशन्स भेट देण्यासाठी सतत शोध घेत असतात.
लोकांना शांत, निसर्गरम्य आणि कमी गर्दीची ठिकाणं आवडतात, त्यामुळे ते अशा ठिकाणी प्रवास करण्यास प्राधान्य देतात.
आज आम्ही तुम्हाला केरळमधील एका शांत, निसर्गरम्य आणि कमी गर्दीच्या अप्रसिद्ध हिल स्टेशनविषयी सांगणार आहोत.
उन्हाळ्यात थंड वारा आणि निसर्गरम्य दऱ्यांचा अनुभव घेण्यासाठी वागमोन हे केरळमधील सर्वोत्तम हिल स्टेशन ठरते.
वागमोनला आल्यानंतर तुम्ही तलावात बोटिंग करताना निसर्गाच्या मनमोहक दृश्यांचा अनुभव घेऊ शकता.
हिरवाई आणि निसर्ग प्रेमी असाल, तर वागमोनमधील घनदाट पाइन जंगलाला नक्कीच भेट द्यायला हवी.
वागमोनमध्ये असलेला मरामाला धबधबा हे पाण्याच्या सौंदर्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी एक मनमोहक आणि आकर्षक ठिकाण आहे.
फोटोग्राफी प्रेमींसाठी वागमोन हे नंदनवनच आहे, जिथे निसर्गरम्य दऱ्यांमध्ये सौंदर्य टिपण्याची अनोखी संधी मिळते.