Safest Countries: ट्रॅव्हल लव्हर्ससाठी खास! जगात सर्वाधिक सुरक्षित मानले जाणारे 5 देश कोणते?

Dhanshri Shintre

सर्वात सुरक्षित देश

जगातील कोणते देश सर्वात सुरक्षित मानले जातात? जाणून घ्या त्यांची नावे, वैशिष्ट्ये आणि सुरक्षा टिकवण्यासाठी घेतली जाणारी प्रभावी पावले.

आइसलँड

आइसलँड हा अनेक वर्षांपासून जागतिक शांतता निर्देशांकात पहिल्या स्थानी असून, त्यामुळे तो जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो.

डेन्मार्क

डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे मजबूत सामाजिक मूल्ये आणि कल्याणकारी व्यवस्था नागरिकांना सुरक्षिततेची भावना देतात आणि जीवनमान उंचावतात.

आयर्लंड

आयर्लंड सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर असून, येथे गुन्हेगारी अत्यल्प आहे आणि लोक नैसर्गिक आपत्तींपेक्षा हिंसाचाराची कमी चिंता करतात.

न्यूझीलंड

न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे, कारण येथे हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि पोलिसही बहुधा निशस्त्र असतात, जे सुरक्षिततेचा अनुभव वाढवते.

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रिया पाचव्या क्रमांकावर असून, येथे गुन्हेगारीचं प्रमाण खूप कमी आहे. पर्यटकांनी केवळ लहानमोठ्या चोरीपासून सावध राहणे आवश्यक असते.

प्रवासाची तयारी

तुम्ही प्रवासाची तयारी करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. ती नक्की वाचा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.

NEXT:  जयपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?

येथे क्लिक करा