Shreya Maskar
उत्तपम बनवण्यासाठी मीठ, मोहरी, हिंग, लसूण, हिरव्या मिरची इत्यादी मसाले लागतात.
गव्हाचे पीठ, तेल, कांदा, बेकिंग सोडा, टोमॅटो, कोथिंबीर हे पदार्थ उत्तपम बनवण्यासाठी लागतात.
उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून सर्व छान एकत्र करा.
आता छोट्या कढईत थोडे तेल घालून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची पाने टाकून फोडणी द्या.
तयार झालेली फोडणी गव्हाचे पीठत टाकून छान मिक्स करून घ्या.
आता पॅनमध्ये तेल टाकून त्यात गव्हाच्या पिठाचे बॅटर पसरवा.
यावर बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो आणि कोथिंबीर पसरवा.
पुदिन्याच्या चटणीसोबत उत्तपमचा आस्वाद घ्या.