Dhanshri Shintre
माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची तब्बल ८,८४९ मीटर म्हणजेच २९,०३२ फूट आहे.
८,००० मीटरच्या वरच्या भागाला ‘डेथ झोन’ म्हणतात कारण तिथे प्राणवायू खूपच कमी प्रमाणात असतो.
जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची उंची दरवर्षी सुमारे २ मिलिमीटरने वाढते, असं नेचर जिओसायन्स मासिक सांगते.
माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर ताशी १६० किलोमीटर वेगाने अतिशय थंड आणि प्रचंड वेगाचे वारे वाहतात.
चीनने माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरही ५जी नेटवर्क सुरू करून तंत्रज्ञानाची किमया उंच शिखरावरही दाखवली आहे.
माउंट एव्हरेस्टवर थंडीचा कडाका इतका असतो की तापमान थेट -६० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते.
माउंट एव्हरेस्ट हा आशियातील प्रसिद्ध हिमालय पर्वतरांगेचा भाग असून तो जगातील सर्वोच्च शिखर मानला जातो.
नेपाळ-चीन सीमेला लागून असलेला माउंट एव्हरेस्ट, नेपाळीत 'सागरमाथा' आणि तिबेटी भाषेत 'चोमोलुंगमा' या नावाने ओळखला जातो.
दरवर्षी माउंट एव्हरेस्टवर चढाईदरम्यान ३०० पेक्षा अधिक गिर्यारोहक जीव गमावतात, शारीरिक ताण आणि कठीण हवामानामुळे.
२९ मे १९५३ रोजी एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांनी माउंट एव्हरेस्टवर पहिल्यांदा यशस्वी चढाई केली.