Manasvi Choudhary
प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा मुलीने स्वतःच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. x
प्रत्येकाला खूश करण्यासाठी नेहमी 'हो' म्हणण्याची गरज नसते. जिथे स्वतःच्या आत्मसन्मानाचा प्रश्न येतो, तिथे योग्य वेळी ठामपणे 'नाही' म्हणण्याची हिंमत मुलीमध्ये असली पाहिजे.
पैशांचे व्यवस्थापन करणे लहानपणापासूनच शिकवावे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली मुलगी भविष्यात स्वतःचे निर्णय अधिक खंबीरपणे घेऊ शकते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जबाबदारी स्वतः घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. पौष्टिक आहार, व्यायामाची सवय आणि मासिक पाळीसारख्या विषयांवर उघडपणे बोलून तिला आरोग्याविषयी योग्य माहिती द्यावी.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात मुलींना ऑनलाइन सुरक्षिततेचे धडे देणे अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावर कोणती वैयक्तिक माहिती शेअर करावी आणि कोणती टाळावी, तसेच ऑनलाइन सुरक्षित कसे राहावे हे समजवावे.
प्रत्येक गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवण्याऐवजी किंवा अन्याय सहन करून गप्प बसण्याऐवजी, योग्य वेळी योग्य प्रश्न विचारण्याची सवय तिला लावावी. यामुळे तिचा शिकण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो.
इतरांचा आदर करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकाच स्वतःचा आदर करणेही महत्त्वाचे आहे.
समाजाच्या चौकटीत मुलींना बांधून न ठेवता, तिच्या आवडी-निवडी ओळखून तिला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
जग काय म्हणेल यापेक्षा स्वतःचे मत, स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वतःचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका, हा आत्मविश्वास आईनेच मुलीच्या मनात निर्माण करायला हवा.
आयुष्य म्हणजे फक्त यश नाही. अपयशाने खचून न जाता प्रत्येक चुकीतून शिकून पुन्हा नव्याने उभे कसे राहायचे, हा सर्वात मोठा धडा मुलीला आईकडूनच मिळतो.