Manasvi Choudhary
तुम्ही देखील तुमच्या मुलासाठी सोन्याचा कडा घेण्याचा विचार करत असाल तर खालील सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स पाहा. १० ग्रॅम वजनामध्ये तुम्ही मुलांसाठी अतिशय सुंदर, मजबूत कडा बनवू शकता.
आजकाल सोन्याच्या कड्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. प्लेन गोलाकार डिझाईनमध्ये या कड्याला स्क्रू असतो. ज्यामुळे कडा घालायला आणि काढायला सोपा होतो.
तुम्हाला जर डिझाईनमध्ये कडा घ्यायचा असेल तर सोन्याच्या कड्यावर बारीक नक्षीकाम केलेला कडा तुम्ही निवडू शकता.
अनेकांना सोन्याच्या दागिन्यांमध्ये धार्मिक चिन्हे किंवा देवाचे प्रतीक असलेले आवडते. यासाठी तुम्ही कड्यामध्ये ही डिझाईन निवडू शकता.
लहान मुलांच्या हातातील कड्यामध्ये हटके डिझाईन तुम्ही निवडू शकता. १० ग्रॅममध्ये हा कडा दिसायला खूप भारदस्त आणि आकर्षक वाटतो.
लहान मुलांसाठी तुम्ही हा कडा बनवत असाल तर अडजस्टेबल ओपन कडा अशी डिझाईन करा. कारण मुले मोठी होतात तसा कडा हाताला घट्ट बसेल.