ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Samsung Galaxy Z सीरीज मधील Flod7 & Flip मोबाईल फोन बाजारात आणले आहेत.
पहिला Samsung Galaxy Z Fold7 आणि दुसरा Samsung Galaxy Z Flip7 आहे. कंपनीने Flip7 चे दुसरे व्हर्जन FE देखील आणले आहे.
Samsung Galaxy Z Fold7 256 GB ते 1 TB पर्यंत तीन प्रकारांमध्ये येईल.
Samsung Galaxy Z Fold7 फोल्डेबल फोन दोन प्रकारांमध्ये येईल. 256 GB आणि 512 GB.
त्याच वेळी, Galaxy Z Flip7 FE दोन्हीपेक्षा किंचित स्वस्त असेल, परंतु ते जास्तीत जास्त 256GB पर्यंतच उपलब्ध असेल.
सर्व Galaxy Z Flip7 FE आणि Fold7 मोबाईलची किंमत 89,999 ते 2,10,999 रुपयांच्या दरम्यान असेल.
1 TB स्पेस असलेला Samsung Galaxy Z Fold7 मोबाईल सर्वात महाग असेल म्हणजेच २ लाख १० हजार ९९९ रुपये.
Galaxy Z Flip7 FE काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असेल. उर्वरित ब्लू शॅडो, जेट ब्लॅक, कोरल रेड आणि सिल्व्हर शॅडोमध्ये उपलब्ध असतील.
तसेच, या सिरीजमध्ये मिंट कलर व्हेरिएंट मोबाईल फक्त सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतील.
Samsung Galaxy Z Fold आणि Flip भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे, तेही १२,००० रुपयांपर्यंतच्या सवलतीसह.