Sakshi Sunil Jadhav
आरोग्याच्या तक्रारी असतील तर आज कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. धावपळ आणि दमणूकीचा आजचा दिवस असेल.
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. का आज हे घडतंय याचे कारण कळणार नाही. वस्तू गहाळ होणार नाहीत ना याचीही दक्षता घ्या.
महत्वाच्या गाठीभेटींचा आजचा दिवस आहे. बैठका पार पडतील. कामांमध्ये नव्याने गती येईल.
सगळ्यांशी चांगले वागणे आपल्याला नेहमीच आवडते. सामाजिक क्षेत्रात आज विशेष हुरूपाने भाग घेणार आहात. दिवस चांगला आहे .
द्रुतगती प्रवास घडतील. जबाबदारीने एखादे काम करण्यासाठी पुढे व्हाल. महत्त्वाची घटना महत्त्वाची गोष्ट कानावर येईल.
वाहने जपून चालवावेत आज हा महत्त्वाचा सल्ला विचारात घ्या. कामाच्या बाबतीत मात्र इतर कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
भागीदारी व्यवसाय असेल तर आज त्यामध्ये सुयश लाभेल. जोडीदाराची सुद्धा उत्तम साथ लाभल्यामुळे तिळातिळांनी का होईना यश वृद्धींगत होईल.
शत्रूंवर मात करून पुढे जाल. नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी वर्गाकडून आपल्याला उत्तम सहकार्य मिळणार आहे.
बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगतीचे योग आहेत. आपल्या वरिष्ठांचे सहकार्य लागेल. प्रेमामध्ये नवीन दिशा कळेल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. प्रगती दिसते आहे.
मनाने अशी एखादी ठरवलेली गोष्ट जिद्दीने पार पाडाल. भावंड यांचे विशेष सहकार्य आहे. दिवस चांगला आहे.
जुनी येणी वसूल होणार आहेत. व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अवगत कराल. ठरवलेल्या गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आज आपला पुढाकार असेल.