Saam Tv
मुतखडा किंवा किडनी स्टोनचा रुग्णांना प्रचंड त्रास होतो.
मुतखड्याचा त्रासात डॉक्टर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात.
मुतखड्याच्या समस्येवर कोमट पाणी पिणं फायदेशीर मानलं जातं.
मुतखड्याच्या रुग्णांना दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण खूप आवश्यक असतं.
या समस्येत सतत थकवा जाणवत असतो. त्यावेळेस कोमट पाण्याचा वापर केला जातो.
मुतखड्याचा त्रास होताना पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचीही समस्या जाणवते.
त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
मुतखड्यामध्ये लघवीचा प्रवाह कमी होतो किंवा थांबतो. शरीरातील पाण्याचा प्रवाह सुधारण्यासाठी कोमट पाणी प्यावे.