Liver Detox Drinks: फॅटी लिव्हर कंट्रोल करण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर ठरेल फायदेशीर

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे लिव्हरशी संबंधित समस्या वाढताना दिसतात. यामध्ये फॅटी लिव्हर ही समस्या अनेकांमध्ये आढळते. पण काही घरगुती ड्रिंक्सच्या मदतीने लिव्हर डिटॉक्स करु शकता.

detox water for liver

लिंबू पाणी (Lemon Water)

लिंबामध्ये व्हिटॅमिन C मुबलक असतं, जे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतं. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू घालून पिणं फायदेशीर ठरतं.

Lemon Water | GOOGLE

हळदीचं दूध (Turmeric Milk)

हळदीत अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. याने लिव्हरमध्ये असणारी सूज कमी होते आणि त्याची कार्यक्षमताही सुधारते.

Turmeric Milk

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरमधला फॅट कमी करण्याचं काम करतात.

Green tea

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

लिव्हरमध्ये जास्त चरबी साठल्यावर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. वेळेवर उपचार केले नाहीत तर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

liver detox drinks

व्यायामाची गरज

तुम्ही या ड्रिंक्ससोबतच नियमित व्यायाम केल्याने फॅटी लिव्हर लवकर कंट्रोलमध्ये येतो.

liver disease prevention

तेलकट आणि जंक फूड

जास्त प्रमाणात तेलकट, गोड आणि प्रोसेस्ड फूडमुळे लिव्हरवर ताण येतो, त्यामुळे हे पदार्थ कमी खाणं योग्य राहील.

Junk Food | google

पाणी जास्त प्या

पुरेसं पाणी प्यायल्याने शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि लिव्हर निरोगी राहतं.

drink water

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर लिव्हरशी संबंधित त्रास वाढत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

healthy lifestyle liver

NEXT: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

Sachin cricket records
येथे क्लिक करा