Liver Damage Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं हे संकेत, वेळीच ओळखा सुरूवातीचे लक्षणे

Manasvi Choudhary

लिव्हर

लिव्हर हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. शरीरातील रक्त शुद्ध करणे, पनचक्रिया सुधारण्यास मदत करणे व शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करते.

Liver

चुकीची जीवनशैली

मात्र आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हरवर परिणाम होत आहे. लिव्हर खराब होण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.

Liver Damage Symptoms

त्वचेचा रंग बदलणे

लिव्हर खराब होण्याचे सुरूवातीचे लक्षण म्हणजे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळसर पडणे. यकृत निकामी होऊ लागल्यास शरीरातील 'बिलीरुबिन'चे प्रमाण वाढते, ज्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी दिसते

Yellow eyes

पोटाच्या समस्या

पोटात जळजळ, पोट सुजणे आणि शरीर कमजोर होणे हि लिव्हर खराब होण्याची संकेतं आहेत.

Liver Damage Symptoms

भूक न लागणे

त्वचेवर खाज येणे, भूक न लागणे, पायाला सूज येणे ही लक्षणे दिसली तर लगेचच वैद्यकीय सल्ला घ्या. ही लिव्हर खराब होण्याची सुरूवातीची लक्षणे आहेत.

Liver Damage Symptoms

तिखट तेलकट पदार्थ खाणे टाळा

तिखट, तेलकट पदार्थ खाल्ल्याने लिव्हरची कार्यक्षमता बिघडते ज्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. वजन वाढणे, जंक फूडचे सेवन करणे यामुळे लिव्हरची समस्या निर्माण होते.

Avoid Spicy Foods | Canva

थकवा येणे

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर न पडल्यामुळे सतत थकवा जाणवतो आणि अन्नावरची वासना उडते.

Weakness | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Kidney Failure Signs: किडनी फेल होण्याचे पहिले लक्षण कोणते?

येथे क्लिक करा...