Sakshi Sunil Jadhav
एकदा का महिलेचं लग्न झालं की संसारातून आणि तिच्या रोजच्या धावपळीतून स्वत: कडे लक्ष द्यायला मिळत नाही.
लग्न झाल्यावर महिलांची फक्त धावपळच नाहीतर तिच्या शरीरातही मोठ्या प्रमाणात बदल होतात. पण महिलांच्या शरीराशी संबंधित काही गोष्टी गूढ मानल्या जातात.
अनेक महिलांना असा प्रश्न असतो की, लग्नानंतर स्तनांच्या आकारात वाढ किंवा काही बदल होतो का? पुढे आपण याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत.
दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता गुप्ता यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर स्त्रियांच्या शरीरात बदल होतात आणि स्तनांचा आकारही वाढतो हा फक्त गैरसमज आहे.
तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या स्तनांचा आकार वाढण्यामागचे कारण फक्त अनुवांशिकता आणि हार्मोनल घटकांवर अवलंबून असतो.
अनेकजण याचा संबंध थेट लग्नाशी जुळवतात. काही जण याचा संबंध लैंगिकतेशी जुळवतात. मात्र हे असत्य आहे. याचा स्तनांच्या वाढीशी संबंध नाही.
स्तनांचा आकार वाढण्याचे मूळ कारण हे गर्भधारणा, वजन वाढ किंवा औषधांच्या शरीरावर झालेला परिणाम आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.