High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलची ही ५ लक्षणं असू शकतात सर्वात धोकादायक

Sakshi Sunil Jadhav

बदलती जीवनशैली

सध्याच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर होतोय. तसेच काही गंभीर आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतंय.

high cholesterol symptoms

कोलेस्ट्रॉलची लक्षणे

हाय कोलेस्ट्रॉल हा आजार खूप गंभीर असतो. जर तुमच्या छातीत अचानक तीव्र वेदना, अस्वस्थता आणि कारण नसताना जास्त थकवा अशा समस्या जाणवत असतील तर तुम्ही सावध राहीलं पाहिजे.

cholesterol warning signs

नसांचे होणारे नुकसान

हाय कोलेस्ट्रॉल वाढला की पायांच्या नसांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याने कमरेखालच्या वेदनाही वाढतात.

heart health tips

वाढणारे आजार

जेव्हा कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते तेव्हा ब्लड फ्लो आणि ऑक्सिजनची कमतरता तुम्हाला जाणवू शकते. तसेच नखांचा रंगही बदलतो.

heart health tips

हार्ट अटॅक

जेव्हा शरीरातला कोलेस्ट्रॉल वाढतो तेव्हा बऱ्याचदा लक्षणं जाणवत नाहीत. याचा थेट खुलासा हार्ट अटॅक आल्यावरच होऊ शकतो.

heart health tips

व्यायाम करा

कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून लांब राहण्यासाठी रोज अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी तुम्ही मेडिटेशनचा पर्याय सुद्धा निवडू शकता.

chest pain symptoms

आहारातील बदल

कोलेस्ट्रॉलपासून लांब राहायचं असेल तर आहारात योग्य तो बदल केला पाहिजे. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, डाळिंब, ड्रायफ्रुट्स अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

chest pain symptoms

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

chest pain symptoms

NEXT : वाईट काळात 'हे' ३ मित्र कधीच सोडत नाहीत साथ! चाणक्यांनी सांगितलेले गुपित माहीत आहे का?

Chanakya Niti | chatgpt
येथे क्लिक करा