Sakshi Sunil Jadhav
मंगळाची ताकद आणि धाडस असणारी आपली रास आहे. लांबचे प्रवास द्रुतगती प्रवास वाहनांवर एक वेगळीच मांड आज आवडेल. कामानिमित्त प्रवास होतील.
शुक्र प्रधान असणारी आपली रास. अचानक पैसा मिळण्याचे आज योग आहेत. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्यायला लागेल. केलेल्या कामाचे लगेच श्रेय मिळेल असा आजचा दिवस नाही.
बुध प्रधान असणारी आपली रास. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. त्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे काम करायला हुरूप येईल.
चंद्र म्हणजे मन मनाशी निगडित असणाऱ्या गोष्टी आज घडतील. काही वेळेला मन उदासीन वाटेल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो आज नकोतच.
रवी प्रधान असणारी आपली रास. आज तुमच्या मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नव्याने काही परिचय होतील उपासनेला दिवस उत्तम आहे. रवी उपासना करावी.
बुधाची आवडती असणारी आपली रास आहे. उत्साह, उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमचे व्यक्तिमत्व बहरत राहील. कुटुंबीय सुद्धा तुम्हाला केलेल्या गोष्टींविषयी पात्र समजतील.
शुक्र प्रधान असणारी आपली रास. आज नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. घडलेल्या गोष्टींचे योग्य अवलोकन कराल.
मंगळाची असणारी आपली रास. व्यावसायिक क्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय होतील. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा सुसंवाद साधून पुढे जाण्याचा योग आहे.
गुरु प्रधान असणारी आपली रास. आज मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभण्याचा दिवस आहे. काय केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो हे समजून घ्या.
शनिचे कारकत्व कायमच आपल्या राशीवर असते . खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काय चुकले काय बरोबर याचा शोध घेण्यात पुढे जाल. त्यामुळे अध्यात्मिक कल वाढेल.
शनीची आवडती असणारी रास आहे. आज वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासामुळे पुढे जाल.आरोग्य उत्तम राहील.
साधा स्वभाव वृद्धिंगत होणारी आपली रास. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल. राजकीय क्षेत्रात आघाडीवर राहण्याचे योग आहे.