Shruti Vilas Kadam
अस्फिया बानो मोहम्मद फरीद खान (Asfiya Bano Mohammad Farid Khan), 22 वर्षांची, लखनऊची राहणारी एक प्रसिद्ध इन्फ्लुएंसर होती.
अपघातावेळी अस्फियाच्या गाडीमध्ये ड्रायव्हर व सहप्रवासी अर्बाज अहमद (24), अरिफ अज़ाम (24), ऋझवान खान (26) होते. हे सर्व लोक मुंबईहून लोणावळ्याकडे जात होते.
हा प्रकार पुण्याच्या पालसपे परिसरातील मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर घडला, रात्री 12 च्या सुमारास. गाडीचा ड्रायव्हर नूर आलम खान (34) वेगाने वाहन चालवत होता.
गाडी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे कंक्रीट ब्लॉकला धडकली आणि पलटी घेतली. यामध्ये अस्फिया बानोला जबरदस्त दुखापत झाली. रुग्णालयात नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
या अपघातात इतर चार सहप्रवासीही गंभीर जखमी झाले होते. त्यांचे मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
पोलीसांनी ड्रायव्हरवर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे यामध्ये रॅश ड्रायव्हिंग, अपघातामुळे मृत्यू यांचा समावेश आहे.
अस्फिया सोशल मीडियावर विशेष प्रसिद्ध होती, तिच्याकडे एक लाखापेक्षा अधिक फॉलोवर्स होते. तिच्या मृत्यूच्या बातमीमुळे तिच्या फॉलोवर्सना मोठा झटका मिळाला आहे.