Shruti Vilas Kadam
सामान्यतः प्रति किलो वजनामागे ३० ते ३५ मिली पाणी पाणी पिणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, ६० किलो वजन असल्यास दिवसाला सुमारे १.८ ते २.१ लिटर पाणी पिणे योग्य ठरू शकते.
50 किलो – 1.5 ते 1.8 लिटर 60 किलो – 1.8 ते 2.1 लिटर 70 किलो – 2.1 ते 2.5 लिटर 80 किलो – 2.4 ते 2.8 लिटर 90 किलो – 2.7 ते 3.2 लिटर
एकाच वेळी जास्त पाणी पिण्यापेक्षा दिवसभरात थोड्या-थोड्या अंतराने पाणी पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते.
घाम जास्त येत असल्यास किंवा नियमित व्यायाम करत असल्यास अतिरिक्त ५०० मिली ते १ लिटर पाणी पिण्याची गरज भासू शकते.
तहान लागणे हे शरीरात पाण्याची कमतरता सुरू झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावा.
उन्हाळ्यात, दमट हवामानात किंवा ताप आल्यास शरीराला अधिक पाण्याची गरज असते. अशावेळी पाण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने पचन सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते, त्वचा निरोगी राहते, थकवा कमी होतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळू शकते.