Shreya Maskar
टोमॅटो उपमा बनवण्यासाठी रवा, टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये रवा हलक्या गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्या. उपम्यासाठी बारीक रव्याचा वापर करा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला. गॅस कमी ठेवा म्हणजे फोडणी जळणार नाही.
मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. त्यानंतर हळद, मीठ आणि साखर घालून मऊ होईपर्यंत परता.
आता उपम्यात गरम पाणी घालून एक उकळी काढून घ्या. त्यानंतर यात भाजलेला रवा टाका आणि मिश्रण एकजीव करून घ्या. उपमा सतत ढवळत रहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
शेवटी गॅस बंद करून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. एका बाऊलमध्ये टोमॅटो उपमा काढून त्यात वरून शेव भुरभुरवा आणि त्याचा आस्वाद घ्या.
टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. लक्षात ठेवा टोमॅटो खाताना त्यातील बिया काढून घ्या.
टोमॅटोमध्ये कॅलरीज कमी असल्याने ते वजन कमी करण्यासाठी उत्तम आहार मानले जातात. टोमॅटोमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.