Hidden Fort In Maharashtra : भंडाऱ्यातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावर करा भटकंतीचा प्लान

Shreya Maskar

सांगडी किल्ला

सांगडी किल्ला, ज्याला 'सहानगड किल्ला' म्हणूनही ओळखले जाते. हा महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली जवळ स्थित असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.

Fort | google

किल्ल्याचा उद्देश

सांगडी किल्ला घुसखोरांना रोखण्याच्या उद्देशाने बांधला होता. सांगडी किल्ला हा साकोली तालुक्यात 'सिवनी दिवाण' घराण्याने उभारलेली एक ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो.

Fort | google

प्रसिद्ध तोफ

सांगडी किल्ला येथील एका प्राचीन आणि पूजनीय तोफेमुळे ('तोफेश्वरी') प्रसिद्ध आहे.

Fort | google

वास्तुकला

फारसा प्रकाशझोतात नसलेला सांगडी किल्ला भंडारा परिसराचा प्रादेशिक इतिहास दर्शवतो. तसेच त्या काळातील स्थानिक लष्करी आणि प्रशासकीय वास्तुकलेची एक झलक दिसते.

Fort | google

निसर्ग सौंदर्य

सांगडी किल्ल्यावरून भंडाऱ्यातील निसर्गरम्याचे सुंदर दृश्य दिसते. हे स्थळ एक नयनरम्य आणि शांत ठिकाण म्हणून ओळखले जाते.

Fort | google

सांगडी तलाव

सांगडी किल्ला हा भोसलेकालीन किल्ला आहे. सांगडी किल्ल्याच्या जवळ 'सांगडी तलाव' देखील आहे.

Fort | google

सद्यस्थिती

सहानगड किल्ला पडझड आणि दुर्लक्षित अवस्थेत आहे, तरीही परिसरातील पर्यटनासाठी एक ऐतिहासिक ठिकाण आहे.

Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Fort | google

NEXT : पुण्यात लपलाय वन डे ट्रेकिंग स्पॉट, 'या' किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे सुंदर दृश्य

Hidden Fort In Pune | saam tv
येथे क्लिक करा...