Shruti Vilas Kadam
गडावर जाण्यासाठी 9 लाख पायऱ्या आहेत अशी धारणा आहे. त्यामुळे अनेक लोकांचा जेजुरीवर ९ लाख पायऱ्या आहेत असा समज होतो.
मात्र वास्तवात खंडोबाच्या जेजुरी गडावर जाण्यासाठी ३८५ ते ४५० पायऱ्या आहेत.
या पायऱ्या बांधण्यासाठी 9 लाख दगड वापरण्यात आले होते. यामुळे याचा उल्लेख 9 लाख पायऱ्या ओळखले जाते.
जेजुरी गडावरील मंदिरात म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन मूर्ती आहेत.
या मंदिरात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन करुन ठेवलेल्या आहेत.
साधारण ४५ मिनिटे ते दीड तासात गडाच्या माथ्यावर पोहोचता येते. हा वेळ तुमच्या गतीवर आणि हवामानावर अवलंबून असतो.
पावसाळ्यात गड परिसर हिरवाईने नटलेला असतो. धुके, डोंगररांगा आणि थंडगार वातावरणामुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी होते.