Shruti Vilas Kadam
प्रायमर लावल्याने त्वचा गुळगुळीत होते आणि मेकअप चांगला सेट होण्यास मदत होते. त्यामुळे मेकअप जास्त वेळ टिकू शकतो.
पावसाळ्यात जाड थराचे फाउंडेशन टाळा. लाइटवेट किंवा मॅट फिनिश फाउंडेशन वापरल्यास मेकअप नैसर्गिक दिसतो आणि लवकर वितळत नाही.
वॉटरप्रूफ काजळ, मस्कारा आणि आयलाइनर वापरल्यास पावसात किंवा दमट हवेत मेकअप पसरण्याची शक्यता कमी होते.
मेकअप पूर्ण झाल्यानंतर हलक्या हाताने सेटिंग पावडर लावा. त्यामुळे अतिरिक्त तेलकटपणा कमी होण्यास आणि मेकअप सेट राहण्यास मदत होते.
मेकअप झाल्यानंतर सेटिंग स्प्रे वापरल्यास मेकअप अधिक वेळ टिकण्यास मदत मिळू शकते आणि चेहरा फ्रेश दिसतो.
दमट हवेमुळे घाम येऊ शकतो. अशावेळी चेहरा चोळण्याऐवजी ब्लॉटिंग पेपर किंवा टिश्यूने हलक्या हाताने अतिरिक्त तेल आणि घाम टिपा.
पावसाळ्यात मॅट किंवा लाँग-लास्टिंग लिपस्टिक अधिक टिकते. लिप लाइनर वापरल्यास लिपस्टिक पसरत नाही आणि जास्त वेळ व्यवस्थित राहते.