Sakshi Sunil Jadhav
PCOD ही एक सामान्य पण गुंतागुंतीची स्त्रियांमधील हार्मोनल समस्या आहे.
पीसीओडी आजारामध्ये अंडाशयात लहान लहान सिस्ट्स (गाठी) तयार होतात आणि हार्मोनल असंतुलन निर्माण होते.
PCOD ही ‘कायमची’ बरी होणारी समस्या नाही, पण योग्य उपाययोजनांनी ती पूर्णपणे नियंत्रणात आणता येते.
बऱ्याच महिलांमध्ये जीवनशैलीतील योग्य बदलांनी लक्षणे इतकी कमी होतात की त्यांना औषधांची गरजही राहत नाही.
फक्त 5-10% वजन कमी केल्यासही पाळी नियमित होऊ शकते.
रोज 30-45 मिनिटे चालणे, योगा, झुंबा किंवा कार्डिओ व्यायाम लाभदायक.
साखर, मैदा, आणि तळलेले पदार्थ कमी करा. प्रोटीनयुक्तच आहार घ्या.
मेडिटेशन, योगा आणि झोपेची नीट काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.