Surabhi Jayashree Jagdish
दररोज दोन आंबे खाल्ल्याने रक्तातील साखर किती वाढेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. कारण आंब्याचा आकार, त्यातील नैसर्गिक साखरेचं प्रमाण, व्यक्तीचं वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्याची स्थिती यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
आंबा हे पोषक तत्त्वांनी भरलेलं फळ असले तरी त्यामध्ये नैसर्गिक साखरही असते. मध्यम आकाराच्या एका आंब्यात साधारण 20 ते 25 ग्रॅम नैसर्गिक साखर असू शकते. त्यामुळे दोन आंबे खाल्ल्यास साखरेचं प्रमाण वाढू शकतं.
मध्यम आकाराच्या दोन आंब्यांमधून साधारण 250 ते 300 कॅलरी मिळू शकतात. या अतिरिक्त कॅलरी शरीरातील ऊर्जा आणि साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात आंबे खाल्ल्यास वजन वाढण्याचाही धोका असू शकतो.
ज्यांची रक्तातील साखर सामान्य असते त्यांना दोन आंबे खाल्ल्यानंतर फारसा त्रास जाणवत नाही. शरीरातील इन्सुलिन साखरेचं नियंत्रण करण्याचं काम प्रभावीपणे करतं. त्यामुळे निरोगी व्यक्ती मर्यादित प्रमाणात आंब्याचा आनंद घेऊ शकतात.
मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील साखर तुलनेने अधिक वाढू शकतं. त्यामुळे किती आंबे खावेत हे वैयक्तिक आरोग्याच्या परिस्थितीनुसार ठरवावं.
आंबा जेवणासोबत किंवा संतुलित आहाराचा भाग म्हणून खाणं अधिक योग्य आहे. यामुळे साखर अचानक वाढण्याचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसंच दिवसातून अनेक वेळा गोड पदार्थ खाणं टाळणंही महत्त्वाचे आहे.
आंब्यासोबत सुका मेवा, दही किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ घेतल्यास साखरेचं शोषण तुलनेने मंद होऊ शकतं. फायबरयुक्त पदार्थांमुळेही रक्तातील साखरेतील चढउतार कमी होण्यास मदत मिळते.