Shukra Gochar saam tv
वेब स्टोरीज

Shukra Gochar 2026: १०० वर्षांनी शुक्राच्या गोचरमुळे तयार होणार समसप्तक राजयोग; पैसे मिळवून 'या' राशी जगणार ऐशोआरामात आयुष्य

ज्योतिषांच्या मते, शुक्राचा गोचर हा नेहमीच संपत्ती, ऐश्वर्य आणि भौतिक सुखसोयींशी संबंधित मानला जातो. यंदा १०० शुक्राच्या गोचरामुळे समसप्तक राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, ऐश्वर्य आणि विलासितेचे दाता शुक्र वर्ष 2026 मध्ये धनु राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्राच्या धनु राशीत गोचरामुळे गुरुशी समसप्तक योग तयार होणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

मात्र यावेळी ३ राशी अशा आहेत, ज्यांचं भविष्य या काळात उजळू शकणार आहे. या राशींना नवीन नोकरीसह करिअरमध्ये प्रगतीचे योग तयार होणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

कर्क रास (Cancer Zodiac)

समसप्तक राजयोगाचा निर्माण कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभाचे योग तयार होणार आहेत. प्रेमसंबंधी बाबींमध्ये यश मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येण्याची दाट शक्यता आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

समसप्तक राजयोगामुळे धनु राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. काम करण्याच्या शैलीत निखार येईल आणि व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक होणार आहे. कामकाजाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. जोडीदारासोबतचे संबंध रोमँसने भरलेले राहतील.

मकर रास (Makar Zodiac)

समसप्तक राजयोगाचा निर्माण मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला कामकाजात प्रगती मिळणार आहे. भावंडे आणि सहकाऱ्यांचा चांगला साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळणार आहे. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Video : नाईटक्लबमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, २५ जणांचा होरपळून मृत्यू, दुर्घटनेचा भयानक व्हिडिओ

Girija Oak : 'नॅशनल क्रश'कडे ४०० हून अधिक साड्या; किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

IndiGo : इंडिगोच्या घोळाचा नेत्यांना फटका, नागपूरला जाणाऱ्या आमदारांची तिकिटे रद्द

Shocking : जालना हादरलं! पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणाची सटकली; महिलेचा गळा आवळला अन्...

SCROLL FOR NEXT