Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि उत्तम मार्गदर्शक होते. त्यांची चाणक्य निती लोक आजही फॉलो करतात.
पुढीला लेखात चाणक्यांनी अशा त्यांचा उल्लेख केला आहे जे चांगले दिसतात पण आतून हानिकारक असतात. यांच्यापासून नेहमी सावध राहिलं पाहिजे.
चाणक्यांच्या मते, वरवरची मैत्री, स्वार्थी आणि नकारात्मक लोक हळूहळू आपल्या आयुष्यातली शांतता हिरावून घेतात. त्यांना ओळखून त्यांच्या पासून लांब राहिलेलं नेहमीच योग्य ठरतं.
चाणक्य म्हणतात, असे काही लोक आहेत जे आपल्यासोबत अफाट प्रेमाने वागतात, आपल्याला आधार देतात आणि कधीकधी खूप विश्वास दाखवतात.
काहींच्या या सवयींमुळे आपल्याला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्याची इच्छा होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी, चाणक्य सावध करतात की गोड दिसणारं प्रत्येक नातं खरोखरच चांगलं असतंच असं नाही.
आचार्य चाणक्य म्हणतात की, कधीकधी लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे येतात. असे लोक बाहेरून खूप प्रेमळ आणि आधार देणारे दिसतात.
मित्रांचा फायदा कमी होताच ते एकतर आपल्यापासून लांब जातात किंवा आपल्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात.
चाणक्य म्हणतात की अशा नात्यांमध्ये अडकणं खूप धोकादायक असू शकतं. कठीण परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांशी तुम्ही मैत्री केली पाहिजे.