Uncle Dance: काकांचा तर नादच खुळा! धावत्या ट्रेनमध्ये लगावले ठुमके; व्हिडीओ व्हायरल

Uncle Dance Dance In Train: व्हिडीओ चार दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता.
Uncle Dance
Uncle DanceSaam TV

Viral Video:

सोशल मिडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसवणारे तर कधी काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अशात सोशल मीडियावर एका काकांचा नादखूळा डान्स व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

Uncle Dance
Viral Gajanan Maharaj: व्हायरल गजानन महाराज आहे तरी कोण? संपूर्ण कुंडली आली समोर

या व्हिडीओमध्ये एक काका मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहेत. त्यांचा उत्साह तरूणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते. अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे.

@drx.sunil_backup नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवरून ६० वर्षांच्या एका व्यक्तीचा हरियाणवी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'काकांच्या मागणीवरून हे गाणे वाजवलं. त्यानंतर काकांनी जबरदस्त डान्स केला. त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून सर्वांनीच आनंद लूटला."

या व्हायरल इंस्टाग्राम रीलमध्ये ट्रेनमधील सर्व सीट भरल्या आहेत. काही प्रवासी येथे झोपून एन्जॉय करतायत तर काही जण बसून आहेत. काही मुलं कोचमध्ये असलेल्या एका मधल्या पॅसेजमध्ये डान्स करतायत. याचवेळी कुलं काकांना नाचण्यासाठी आग्रह करतात.

मग काय त्यांचे आवडते हरियाणवी गाणे 'बोल तेरे मीथे मीठे' वाजताच , काका नाचू लागतात. ट्रेनच्या डब्यातील अर्ध्याहून अधिक प्रेक्षक काकांचा व्हिडिओ बनवताना दिसतायत. काकांचा डान्स पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्यात. व्हिडीओमध्ये काकांच्या स्टेप्स आणि एनर्जी दोन्हीही दिसत आहेत. व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर देखील हसू येईल.

Uncle Dance
Randeep Hooda And Indian Army Soldiers: रणदीप हुड्डाने भारतीय जवानांसोबत धरला बॉलिवूड गाण्यांवर ठेका, Video Viral

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com