Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video
राज्यातल्या जनतेने महायुतीच्या आणि भाजपच्या धोरणावर शिक्कामोर्तब करून आम्हाला पसंती दिली आहे. सत्ता स्थापन झाल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे, असं मत भाजपचे शिर्डीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. विधानसभा निवडणूक निकाल लागण्यास आता सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत सुरुवाटी पासूनच महायुतीला आघाडी मिळतांना दिसत आहे. राज्याच्या जनतेचा कल महायुतीला असल्याने महायुतीकडून आता विजयाची तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातल्या बोलघेवड्या नेत्यांनी त्यांच्या मागे असलेला जनाधार गमावला आहे. पंतप्रधान मोदी आणि महायुतीच्या धोरणावर आता राज्यातल्या जनतेला विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीचं सगळ नियोजन केलं. त्यामुळे आता त्यानीच मुख्यमंत्री व्हावं अशी आमची इच्छा आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.