Sonia Gandhi News: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची तब्येत बिघडली; गंगाराम रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi Hospitalised: सोनिया गांधी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
Sonia Gandhi hospitalised
Sonia Gandhi hospitalisedSAAM TV

Sonia Gandhi Health: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ताप आल्यानंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

गंगाराम रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, सोनिया गांधी यांच्यावर डॉ. अरुप बसू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना 2 मार्च म्हणजेच गुरुवारी ताप आल्याने येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून अनेक टेस्ट केल्या जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Latest Marathi News)

Sonia Gandhi hospitalised
Dhule News: कोट्यावधीचा गुटखा, पानमसाला जप्‍त; सात जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारपासून सोनिया गांधींची तब्येत बिघडली होती. त्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेत सात किलोमीटर मागे मंगळवारी संध्याकाळी दिल्लीला परतले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com