Bandhan Bank Recruitment 2024: १२ वी पास तरुणांनाही बँकर होण्याची संधी; अर्ज कसा करायचा? वाचा एका क्लिकवर

Bandhan Bank Recruitment 2024 Application Process Detail: बंधन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी ही भरती जाहीर केली आहे.
Bandhan Bank Recruitment 2024: १२ वी पास तरुणांनाही बँकर होण्याची संधी; अर्ज कसा करायचा? वाचा एका क्लिकवर
Bandhan Bank RecruitmentSaam TV

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बंधन बँक महाराष्ट्रमध्ये भरती सुरु आहे. १२ वी उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा. बंधन बँकेने या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Bandhan Bank Recruitment 2024: १२ वी पास तरुणांनाही बँकर होण्याची संधी; अर्ज कसा करायचा? वाचा एका क्लिकवर
JOB: या विद्यापीठात सुरु आहे नर्स पदासाठी भरती; मिळणार २९००० रुपये प्रति महिना वेतन; वाचा सविस्तर

बंधन बँकेत रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी भरती सुरु आहे. बंधन बँक संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी ही पदभरती करत आहे. बँकेत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

बंधन बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. २१ ते ३२ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १६ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे टू-व्हीलर असावी. त्याचसोबत नियमित प्रवास करण्याची तयारी असावी अशी अट बंधन बँकेने घातली आहे. या नोकरीसाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला काम करावे लागणार आहे.

Bandhan Bank Recruitment 2024: १२ वी पास तरुणांनाही बँकर होण्याची संधी; अर्ज कसा करायचा? वाचा एका क्लिकवर
Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची संधी ;अर्ज करण्याची मुदत वाढवली;जाणून घ्या सविस्तर

उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा बँकेच्या ई- मेल आयडीवर पाठवावा. Territoryhr.mumbai@bandhanbank.com या मेलवर तुमचा अर्ज पाठवावा. मुदतीनंतर तुमचा अर्ज स्विकारला जाणार नाही. याबाबत माहिती बंधन बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Bandhan Bank Recruitment 2024: १२ वी पास तरुणांनाही बँकर होण्याची संधी; अर्ज कसा करायचा? वाचा एका क्लिकवर
Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत १५०० शिकाऊ पदांसाठी भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com