Rupert Murdoch : मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक ९२व्या वर्षी पाचव्यांदा करणार लग्न; ६७ वर्षीय एलेना झुकोवासोबत साखरपुडा

Rupert Murdoch Engagement News : रूपर्ट मर्डोक शेकडो स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया आउटलेटचे मालक आहेत. त्यांनी गेल्या वर्षी फॉक्स आणि न्यूज कॉर्पच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
Rupert Murdoch Engagement News
Rupert Murdoch Engagement News Saam TV
Published On

Rupert Murdoch News :

मीडिया क्षेत्रातील मोठं नाव रूपर्ट मर्डोक यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्डोक यांनी पाचव्यांदा साखरपुडा केला आहे. आता त्यांच्या आयुष्यात 67 वर्षीय निवृत्त जीवशास्त्रज्ञ एलेना झुकोवा यांची एन्ट्री झाली आहे. (Latest Marathi News)

Rupert Murdoch Engagement News
Us Presidential Election: राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून निक्की हेली बाहेर; ट्रम्प -बायडेनमध्ये थेट स्पर्धा

दोघेही गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांना साखरपुडा केला असून लवकरच लग्नबंधनात देखील अडकणार आहेत. रेडिओ होस्ट ॲन लेस्ली स्मिथसोबत त्यांनी साखरपुडा केला होता. दोन आठवड्यातच हे नातं तुटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, रूपर्ट मर्डोक आणि एलेना झुवोका यावर्षी कॅलिफोर्नियातील मोरागा विनयार्ड इस्टेटमध्ये लग्न करू शकतात. 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या अहवालानुसार, लग्नाची तारीख जून निश्चित करण्यात आली आहे. अशारीतीने वयाच्या 92 वर्षी मर्डोक यांचे हे पाचवे लग्न करतील.

मर्डोक यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर, स्कॉटिश वंशाची पत्रकार अॅना मन, चिनी वंशाची उद्योजक वेंडी डेंग आणि अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री जेरी हॉल यांच्याशी लग्न केले होते.

Rupert Murdoch Engagement News
Mumbai Breaking News: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३.७३ कोटींचं सोनं जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई

कोण आहेत रूपर्ट मर्डोक?

रूपर्ट मर्डोक यांनी 1950 च्या दशकात ऑस्ट्रेलियात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर 1969 पर्यंत त्यांनी यूकेमधील 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' आणि 'द सन' ही वृत्तपत्रे विकत घेतली. यानंतर त्यांनी न्यूयॉर्क पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नलसह अनेक अमेरिकन पब्लिशर्स देखील खरेदी केले. 1996 मध्ये, त्यांनी फॉक्स न्यूज लाँच केलं. सध्या फॉक्स न्यूज अमेरिकेत सर्वात जास्त पाहिले जाणारे टीव्ही न्यूज चॅनल आहे.

2013 मध्ये त्यांनी न्यूज कॉर्पची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून मर्डोक शेकडो स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया आउटलेटचे मालक आहेत. त्यांनी गेल्या वर्षी फॉक्स आणि न्यूज कॉर्पच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com