Parrot Missing In MP: हरवलेल्या पोपटासाठी मालकाचा जीव कासावीस; शोधून देणाऱ्याला मिळणार मालामाल करणारं बक्षीस

घरातील एखादं लहान बाळ किंवा कोणताही सदस्य दूर गेल्यास नागरिक जशी त्याची काळजी व्यक्ती करतात तशीच प्राण्यांची देखील काळजी व्यक्त केली जाते.
Parrot Missing In MP
Parrot Missing In MPSaam TV

Madhya Pradesh News: प्राणी, पशू, पक्षी पाळणाऱ्या व्यक्तींचे त्यांच्याशी अनोखे नाते असते. एका माणसाशी जसं नातं जोडलेलं असतं. तसंच काही व्यक्तींना प्राण्यांचा देखील लळा लागलेला आसतो. घरातील एखादं लहान बाळ किंवा कोणताही सदस्य दूर गेल्यास नागरिक जशी त्याची काळजी व्यक्त करतात तशीच प्राण्यांची देखील काळजी व्यक्त केली जाते. (Latest Madhya Pradesh Parrot Missing News)

अशात मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एका कुटुंबातील पाळलेला पोपट हरवला आहे. हा पोपट शोधण्यासाठी कुटुंबीयांनी दिवसाची रात्र केलीये. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या तळमळीने ते आपल्या पोपटाचा शोध घेत आहेत. मात्र पोपट काही सापडत नाहीये.

Parrot Missing In MP
Viral Video Soil In Eye: डोळ्यात गेलेली माती आजीने थेट जीभेने बाहेर काढली; रामबाण उपाय पाहून तुम्हीही थक्क व्हाल

जीवापाड जपलेला पोपट (Parrot) अचानक गायब झाल्याने कुटुंबातील सर्व नागरिक चिंतेत आहेत. पोपटाला काही करुन शोधलंच पाहिजे म्हणून त्यांनी थेट दमोह जिल्यातील रस्त्यांवर उतरत रिक्षातून अनाउंन्समेंट केलीये. संपूर्ण शहरात ही अनाउंन्समेंट करण्यात आली आहे.

आमचा पोपट अचानक गायब झालाय. तो कुठे तरी निघून गेला आहे. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी आमची मदत करा. जो कोणी सज्जन व्यक्ती पोपट शोधून देईल त्याला आमच्याकडून १० हजारांचे रोख बक्षीस दिले जाईल. असं या व्यक्तीने म्हटलं आहे. संपूर्ण शहरात देखील त्यांनी पोपट हरवल्याचे पोस्टर लावले आहेत.

Parrot Missing In MP
Crab Attack On Girl: नाद करा पण खेकड्याचा कुठं; नांग्यानी थेट पोरीचे केसच धरले, पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO

या व्यक्तीचा व्हिडिओ आणि पोस्टरर्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पोपटासाठी त्याच्या डोळ्यांतील अश्रू पाहून पाहून त्यावर अनेकांनी हा खरा पशू प्रेमी आहे. त्याला मदत केली पाहिजे असं म्हटलंय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com