वृत्तसंस्था : मध्य प्रदेशमधील विदिशा येथे एका मिशनरी शाळेवर दगडफेक आणि नासधूस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही हिंदू संघटनांनी शाळा व्यवस्थापनावर ८ मुलांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कथित धर्मांतराच्या निषेधार्थवर शाळेवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दगडफेक होत असताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची त्याचवेळी परीक्षा सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामधील गंजबासोडा शहरातील सेंट जोसेफ स्कूलमध्ये हिंदू संघटनेच्या काही संतप्त लोकांनी शाळेच्या मैदानावर गोंधळ घातला आहे. यावेळी त्यांनी शाळेवर दगडफेक करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. शाळेमध्ये मुलांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. दगडफेक होत असताना सेंट जोसेफ स्कूलमध्ये १२वीच्या १४ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती.
हे देखील पहा-
यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे. काही दिवसाअगोदर सेंट जोसेफ शाळेत ८ मुलांचे कथित धर्मांतराचे प्रकरण समोर आले होते. मागील काही दिवसांपासून सातत्याने याविषयी निवेदने देण्यात येत होती. आता हा गोंधळ बघता शहरात स्थानिक चर्च, भारत माता कॉन्व्हेंट स्कूल आणि सेंट जोसेफ स्कूलमध्ये पोलिस प्रशासन तैनात करण्यात आले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात एसपी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून गंजबासोडा येथे सेंट जोसेफ शाळेचे नाव धर्मांतराच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर चर्चेत होते. सोशल मीडियावर एक फोटो देखील पोस्ट करण्यात आला होता.
ज्यामध्ये मुलांवर पाणी शिंपडून त्यांना ख्रिश्चन बनवले जात असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. यामुळे गावात नागरिक संतापले आणि त्यांनी शाळेवर दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर गंजबासोडा येथील इतर मिशनरी शाळा आणि चर्चमध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.