संजय गडदे, मुंबई
Mumabi News: सांताक्रूझमध्ये (santacruz) 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची केअरटेकरने हत्या (Murder Case)केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या हत्या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत आरोपी केअर टेकरला गुजरातच्या अहमदाबाद येथून अटक केली आहे. कृष्णा मनबहादूर पेरियार (30 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी केअर टेकरचे नाव आहे.
अवघ्या सोन्याची साखळी आणि घड्याळासाठी आरोपीने त्यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. हेल्थकेअर अॅट होम या प्लेसमेंट एजन्सीकडून या वृद्ध व्यक्तीला देखरेख करण्यासाठी कृष्णाला नेमले होते. आठच दिवसापूर्वी हा नोकर म्हणून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या घरी कामावर रुजू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 8 मे रोजी डॉक्टर मुरलीधर पुरुषोत्तम नाईक यांच्या तोंडावर सेलोटेप लावून तोंड बंद करून दोन्ही हात पाठीमागे बांधून हत्या केली होती. हत्येनंतर आरोपीने नाईक यांच्या गळयातील अंदाजे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची आणि रूद्राक्षाची साखळी आणि घड्याळ चोरी करुन पळून गेला होता. यासंदर्भात संगीता गर्ग या महिलेने सांताक्रुज पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. सांताक्रुज पोलिसांनी यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासासाठी 10 टीम तयार केली होती.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना नाईक यांच्या केअर टेकरवर आधीपासून संशय होता. आरोपीने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता. तसेच त्याच्या राहण्याचा निश्चित ठावठिकाणा नसताना प्राप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने बोरीवली येथून सौराष्ट्र एक्सप्रेस ट्रेन पकडली असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जी.आर.पी.एफ. पथक, अहमदाबाद यांच्या सहाय्याने पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपीला अटक केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.