Mumbai : जन्मदात्यांनी 'नकोशी'ला वाऱ्यावर सोडले; पण पोलिसांनी जीवदान दिले

अर्भकाला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याचे प्राण वाचवले आहे.
mumbai news
mumbai news saam tv
Published On

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नगर परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक दिवसाच्या नवजात स्री जातीचे अर्भक सोडून दिलेले आढळून आले आहे. समता नगर पोलिसांनी या अर्भकाला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याचे प्राण वाचवले असून त्या बालिकेची प्रकृती आता स्थिर झाल्यानंतर त्याला अंधेरी पश्चिम भागातील अनाथ आश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ( Latest Marathi News)

mumbai news
सोमय्यांची किशोरी पेडणेकरांविरोधात पोलिसांत तक्रार; एसआरए घोटाळ्यावरून केले 'हे' गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी स्त्री जातीचे नवजात अर्भक कांदिवली (Kandivali) पूर्वेकडील मेट्रो स्टेशन परिसरातील किंग सुमो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सोडून देण्यात आल्याचे खबऱ्याकडून समजले. यानंतर समता नगर पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचून ते स्त्री जातीचे अर्भकास जवळील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या नवजात अर्भकास बेवारस म्हणून सोडणाऱ्या त्या असंवेदनशील आई वडिलांचा शोध आता समता नगर पोलीस घेत आहे.

mumbai news
Andheri News : युवकाने आजीचा केला खून, आईचाही दाबला गळा अन् नंतर...

सहा दिवसाच्या उपचारानंतर आता त्या बाळाची प्रकृती स्थिर झाली आहे. या अर्भकास समता नगर पोलिसांनी अंधेरी (Andheri) पश्चिम भागातील विरा देसाई रोड येथील सेंट कॅथरीन होम या अनाथ आश्रमात सांभाळण्यासाठी दिले आहे. समता नगर पोलीस ठाण्याकडून आता त्या निर्दयी माता-पित्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com