NCB ची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावरून ड्रग्स जप्त!

मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी शाखेकडून सातत्याने ड्रग्सची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे.
NCB ची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावरून ड्रग्स जप्त!
NCB ची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावरून ड्रग्स जप्त!Saam Tv
Published On

सुरज सावंत

मुंबई: मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी शाखेकडून NCB सातत्याने ड्रग्सची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. मुंबई विमानतळावर CST आज NCB ने ड्रग्स तस्करी संदर्भात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पाच किलो ड्रग्ज drugs जप्त NCB कडून जप्त करण्यात आले आहे. विमानतळाच्या कार्गो मधून ड्रग्ज हे जप्त केले आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया Australia आणि न्यूझीलंड New Zealand येथे हे ड्रग्ज पाठवले जात होते अशी माहिती आहे. हे ड्रग्स चादरीच्या आत पट्टी बनवून त्यात लपवण्यात आले होते. अफेड्रींन आणि मेटाफेतिमाईन Ephedrine and methamphetamine हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. हे ड्रग्स भारतात India बनवले जाते. आंध्र प्रदेशात Andhra Pradesh हे ड्रग्ज बनवून मुंबई मार्गे हे ड्रग्ज परदेशात पाठवलं जात होतं. प्रामुख्याने आंध्र प्रदेशात हे ड्रग्स बनवून मुंबई Mumbai मार्गे हे ड्रग्स परदेशात पाठवलं जात होतं

NCB ची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावरून ड्रग्स जप्त!
पुण्यात 75 तास लसीकरणाची मोहीम राबवणार - अजित पवार

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे Sameer Wankhede यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेली ही 5 वी मोठी कारवाई आहे. या कारवाईत आतापर्यंत 10 किलो ड्रग्ज जप्त केलेलं आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com