Breaking News

MHADA Lottery: म्हाडाची १३,३९५ घरांसाठी लॉटरी, ऑनलाईन अर्ज कसा कराल?

MHADA House: अनेकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून कोकण मंडळाच्या १३,३९५ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. हा अर्ज नेमका कसा करायचा घ्या जाणून...
MHADA Lottery: म्हाडाची  १३,३९५ घरांसाठी लॉटरी, ऑनलाईन अर्ज कसा कराल?
MHADA LotterySaam Tv
Published On: 

हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा १३ हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री करणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (KHADB) 'बुक माय होम' पोर्टलद्वारे मुंबई महानगर प्रदेशामधील १३,३९५ न विकल्या गेलेल्या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. त्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकता. याद्वारे तुमचं हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.

कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनेमधील घरं विकली गेली नव्हती. ती घरं आता पुन्हा विक्रीसाठी काढण्यात आली आहेत. त्या १३,३९५ घरांच्या विक्रीसाठी 'बुक माय होम' ही नवी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांनी या पोर्टल आणि अर्ज नोंदणीचा शुभारंभ केला. हे पोर्टल संभाव्य घर खरेदीदारांना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' श्रेणी अंतर्गत रिअल टाइममध्ये फ्लॅट पाहण्याची आणि निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

MHADA Lottery: म्हाडाची  १३,३९५ घरांसाठी लॉटरी, ऑनलाईन अर्ज कसा कराल?
MHADA Home: मुंबईत १२ लाखांत घर, म्हाडाकडून अटींमध्ये बदल; अर्ज भरण्याची अंतिम तारिख कोणती?

आधी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजनेतील अर्जदारांना कोणते घर मिळेल यावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. त्यांना लॉटरीद्वारे लागेल ते घर घ्यावे लागायचे. पण 'बुक माय होम' पोर्टलसह अर्जदार आता उपलब्ध घरं रिअल टाइममध्ये पाहू शकतात आणि त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना आवडणारे घर आणि मजला निवडू शकतात. या पोर्टलवर योजना आणि घरांसंदर्भात सर्व माहिती देखील उपलब्ध असेल. ज्यामुळे ज्यांना म्हाडाचे हे घर घ्यायचे आहे त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेता येऊ शकतो.

MHADA Lottery: म्हाडाची  १३,३९५ घरांसाठी लॉटरी, ऑनलाईन अर्ज कसा कराल?
Mhada Lottery: दिवाळीपूर्वी हक्काचं घर होणार! म्हाडा वर्षभरात राज्यात १९,४९७ घरे बांधणार; मुंबईकरांना विशेष फायदा

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील तब्बल १३,३९५ घरांची विक्री झाली नव्हती. त्यामुळे आता ही न विकली गेलेली घरं म्हाडा विकणार आहे. 'बुक माय होम' या पोर्टलवर जाऊन नोंदणी करून घरं मिळवून अनेकांना आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न सत्यात उतरवता येणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता या संधीचा फायदा तुम्हाला करून घेता येऊ शकतो.

MHADA Lottery: म्हाडाची  १३,३९५ घरांसाठी लॉटरी, ऑनलाईन अर्ज कसा कराल?
Mhada House : सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, कारण? पाहा व्हिडिओ

घराच्या नोंदणीपासून ते घराच्या निवडीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइनच आहे. त्यात कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप नाही. नोंदणीच्या वेळी उमेदवारांना त्यांचे आधार कार्ड , पॅन कार्ड आणि स्व-घोषणापत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती वेबसाईटवर अपलोड कराव्या लागतात. अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची डिजिटल प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे पडताळणी केली जाईल. पडताळणीनंतर अर्जदाराचे प्रोफाइल तयार होईल.

अर्जदाराचे प्रोफाइल तयार झाल्यानंतर अर्जदारांना फ्लॅटची यादी पाहायला मिळेल. त्यानंतर अर्जदार त्यांना अपेक्षित असलेले फ्लॅट रिअल टाइममध्ये निवडून बुक करू शकतात. हे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या आधारावर केले जाते. तसंच, उपलब्ध घरांची माहिती फ्लॅट नंबरसह सर्व माहिती अर्जदाराला मिळेल. त्यानंतर अर्जदारास त्यांना आवडेल ते घर आणि आपल्या पसंतीनुसार निवडू शकतात.

MHADA Lottery: म्हाडाची  १३,३९५ घरांसाठी लॉटरी, ऑनलाईन अर्ज कसा कराल?
Mhada Home Price : म्हाडाच्या घराच्या किंमती ३५ टक्क्यांनी कमी होणार, राज्य सरकारकडे प्रस्ताव पोहचला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com