
मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मुंबईत सर्वसामान्यांना घर घेणे हे परवडणारे नाही. त्यामुळे म्हाडा, सिडको या लॉटरीमधून सर्वसामान्य लोक घर घेतात. म्हाडाच्या घराच्या किंमतीही दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु या किंमती पुढे कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं संजीव जयस्वाल यांनी सांगितलं आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सकाळ माध्यम समूहाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होऊ शकतात, असं सांगितलं आहे.
म्हाडाच्या घराच्या किंमती कमी होणार? (Mhada House Price news)
म्हाडाच्या किंमती कमी असल्या तरीही त्या अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. यावर संजय जयस्वाल यांनी सांगितले की, जर म्हाडाच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असत्या तर ३००० घरांसाठी सव्वा लाख अर्ज आले नसते. हे जे दर आहेत ते काही एक्सर्टर्नल फॅक्टरमुळे आहे.म्हाडाच्या घरांमधून नफा कमावणे हा सरकारचा उद्देश नाहीये. सध्या आपण घराच्या किंमती १०-१५ टक्के कमी केल्या आहेत. पुढे भविष्यात आणखी किंमती करण्याचा प्रयत्न असेल. परंतु हे थोडं अवघड आहे.
३५-४० टक्क्यांनी घराच्या किंमती कमी होणार (Mhada Housing Price Decrease)
या ज्या घराच्या किंमती जास्त आहेत असं वाटतंय त्या फक्त ५ एक्सटर्नल गोष्टीमुळे आहे. जर शासनाने प्रिमियम, डेव्हलपमेंट चार्जेस,प्रोसेस, इन्फ्रास्टक्चर चार्जेस, जीएसटीस्टॅम्प ड्युटी यामध्ये जर थोडी सूट देण्यात आली तर घराच्या किंमती ३५-४० टक्के सहज होऊ शकते.
घराच्या किंमती कशामुळे वाढतात?
गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किंमती ४० ते ६० लाख रुपये आहे. मध्यमवर्गीय लोक एवढ्या महागड्या घराचे स्वप्न बघत नाही.त्यामुळे घराच्या किंमती किती कमी होणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर संजय जयस्वाल यांनी सांगितले की,यामध्ये बांधकामाची किंमत, हायरॅकी, शासनाला महसूल हवा असल्याने प्रिमियम, डेव्हलपमेंट चार्ज,स्टॅम्प ड्युटी याचा समावेश होतो.
यासाठी आम्ही शासनाला लेखी स्वरुपात प्रस्ताव पाठवला आहे. जर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असं त्यांनी सांगितलं.
दुर्बल घटकांसाठी ओव्हरडेड चार्जेस कमी केले तर घराच्या ३५ टक्के कमी होऊ शकते. मुंबईच्या जमिनीच्या किंमती खूप जास्त आहे. या किंमती कोणत्याही शहराशी आपण २५ टक्के ते १० टक्के घट केली आहे. याच्यापुढे ही घट होणे शक्य नाही. परंतु जर ओव्हरहेड चार्जेस कमी झाले तर कदाचित किंमती कमी होऊ शकतात. आता अल्पउत्पन्न आणि मध्यम उत्पन्न ्सलेल्या गटासाठी घराच्या किंमती ५० लाखांच्या आत करण्याचे आमचे प्रयत्न आहे.शासनाचे इन्फ्रास्टक्चर आणि कनेक्टिव्हिटी वाढत आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.