''भोसरी भुखंड व्यवहार माझ्या पत्नी आणि जावयाने केले, पण जेव्हा जेव्हा ईडीने मला चौकशीला बोलवले त्यावेळी मी चौकशीला हजर राहिलो. ईडीच्या चौकशीला मी सहकार्य केले. जेव्हा जेव्हा ईडीने जी जी कागदपत्रे मागितली ती ती त्यांना पुरवली. आतापर्यंत प्राप्तिकर खात्याने दोनदा चौकशी केली, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होता. मात्र तरीही वेगवेगळ्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात आला. भोसरी भुखंड व्यवहार ४ कोटी रुपयांत ठरवण्यात आला. पण त्याने कोणांच नुकसान झालं का,'' असा सवाल विचारत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भोसरी भुखंड व्यवहार प्रकरणी स्पष्टीकरण दिले. याशिवाय त्यांनी, सीडी प्रकरण, ईडी प्रकरण आणि राज्यातील राजकीय वातावरणावरही भाष्य केले. साम'ला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत ते बोलत होते.
हे देखील पहा-
- सीडी प्रकरण
सीडी बाबत केलेल भाष्य हे गमतीने केलं होत. एक सीडी माझ्या हाती लागली होती. यासाठी माझे एकाशी बोलणे झाले होते. तो आवाज जनतेच्या आणि जळगावच्या ओळखीचा आहे. त्याच्याकडून मी ही सीडी मिळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने ऐनवेळी सीडी साठी २ कोटींची मागणी केली. त्यानंतर मी याबाबत पोलीसांकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलीसांचा तपास सुरु आहे.
- ईडीची पिडा
जेव्हा मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत आलो तेव्हा मला जयंत पाटील म्हणाले, नाथाभाऊ आता ते तुमच्या मागे ईडी लावतील आणि तसेच झाले. भाजपात असतो तर असं झालं नसतं. आज भाजपातील नेते सोडले तर इतर पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनीदेखील ते मान्य केलं होतं. पण न्यायालयात खरं खोटं लवकरच समोर येईल.
महाराष्ट्राची राजकीय पंरपरा-
गेल्या ४० वर्षात महाराष्ट्रातील राजकारण खूप बदलले आहे. हे राज्यातील जनतेला आणि मलाही राजकीय दृष्ट्या आवडलं नाही. आधीही राज्यातील राजकारणात मतभेत, ताणतणाव होते, पण गेल्या ४० वर्षात हे झालं नव्हतं ते आता होत आहे. मी असे प्रसंग आधीही पाहिले आहेत. १९९१ मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांचा बंगला तोडण्यात आला. बाळासाहेब ठाकरेही त्यांना बोलले. त्यानंतर काही वर्षांनी नारायण राणे यांनीदेखील शिवसेना सोडली. तेव्हाही ताणतणाव निर्माण झाले होते. पण आता छगन भुजबळ शिवसेनेसोबत सत्तेत आहेत. तेव्हाही राजकारणात ताणतणाव, मतभेद होते. आताही राजकारणात ताणतणाव, मतभेद आणि शत्रुत्वही वाढले आहे.
दाऊद संबंध प्रकरण
केवळ माझी बदनामी करण्यासाठी माझ्यामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे प्रकरण लावण्यात आले. कोण दाऊद , कोण दाऊदची बायको, मला त्रास देण्यासाठी हे प्रकरण माझ्या मागे लावण्यात आले. आज माझ्याकडे जी संपत्ती आहे ती वडिलोपार्जित आहे. जर त्यापलीकडे काही माझ्या संपत्तीत आढळून आले तर ती मी जनतेला द्यायला तयार आहे. असेही यावेळी एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.