Mumbai Breaking News: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३.७३ कोटींचं सोनं जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई

Mumbai Crime News: प्रवाशांच्या शरीरातून तसेच कपड्यांमधून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
Mumbai International Airport
Mumbai International AirportSaam TV
Published On

Mumbai Airport Crime News

मागील काही दिवसांपासून मुंबईत सोने तस्करीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोने तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कस्टर विभागाने विशेष तपासणी मोहिम सुरू केली आहे. सीमा शुल्क विभागाने गुरुवारी (ता. ७) वेगवेगळ्या कारवायांमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ६.५३ किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai International Airport
Lok Sabha Election 2024: काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर; राहुल गांधी कुठून निवडणूक लढवणार?

या दागिन्यांची किमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३ कोटी ७३ लाख रुपये असल्याचं समजतंय. सोन्याच्या दागिन्यांसह ८ आयफोन देखील करण्यात जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांनी काही तस्करांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

प्रवाशांच्या शरीरातून तसेच कपड्यांमधून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी काही संशयितांची झाडाझडती घेतली. यावेळी कपड्यातून आणि हेडफोनमधून सोन्याची तस्करी केली जात असल्याचं उघडकीस आलं.

याशिवाय विमानाच्या कमोडमध्ये देखील तस्करांकडून सोने लपवण्यात आले होते. ही बाब उघडकीस येताच कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करांना तातडीने अटक केली. त्यांच्याकडून एकूण ६.५३ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

याशिवाय ६ महागडे आयफोन देखील जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या सोन्यांची तस्करी नेमकी कुठून कुठे केली जात होती. याची चौकशी अधिकारी करीत आहेत. या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Mumbai International Airport
LPG वर केंद्र सरकारची मोठी घोषणा, एका वर्षासाठी मिळणार 300 रुपयांची सूट; 9 कोटी महिलांना मिळणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com