
सुशांत सावंत -
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होणार आहे. 2 मार्च म्हणजेच उद्या भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भजप नेते आशिष शेलार हे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थितीत राहणार आहेत (BJP Leaders Important Meeting Before Budget Session).
बैठक झाल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांची उद्या दुपारी पत्रकार परिषदही होणार आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेण्यावर विरोधक ठाम असून, अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) 3 मार्चपासून सुरु होणार आहे. येत्या 25 मार्चपर्यंत हे अधिवेशनाचे कामकाज सुरु राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला (Nagpur) घेण्याचं ठरलं होतं. मात्र, कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे नागपूरला अधिवेशन घेणे शक्य नसल्याने यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्यात यावे, असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सादर करतील.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.