Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Amit Thackeray Reaction On Maharashtra Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत.
Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया
amit thackeraytwitter
Published On

Maharashtra Election Result, Amit Thackeray Reaction: माहिम मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण संघाला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाकडून सदा सर्वनकर निवडणुकीच्या रिंगणात होते.

या तिरंगी लढतीत, महेश सावंत यांनी बाजी मारली. दरम्यान १७१५१ मतांनी पराभव झाल्यानंतर, अमित ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर राज ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली. त्यानी सर्व काही अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

माहिममध्ये ठाकरे गटाची सत्ता

माहिम मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. या मतदारसंघातून अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीत त्यांना सुरुवातीला आघाडी मिळाली.

मात्र त्यानंतर ते पिछाडीवरच राहिले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी ५०२१३ मतं घेतं माहिम काबिज केलं. तर शिवसेना शिंदे गटाचे उमदेवार सदा सर्वनकर यांना १३१६ मतांनी पराभवा पत्कारावा लागला आहे. या पराभवानंतर अमित ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया
Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात

काय म्हणाले अमित ठाकरे?

अमित ठाकरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की,' माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. आत विधानसभा निवडणुकीत जनतेने जो कौल दिला आहे, तो मला मान्य आहे आणि मी आदराने स्वीकारतो. गेल्या अनेक वर्षांसाठी मी या प्रभागातील जनतेचा संघर्ष पाहिला आहे. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो.'

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया
Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

तसेच त्यांनी पुढे लिहिले की, ' येथील जनतेच्या मनात काहीतरी वेगळं असावं. हा कौल हेच शिकवतोय की, मला अजूनतरी खूप काम करायचं आहे. मला अजून संघर्ष करुन माझं कर्तृत्व सिद्ध करावं लागणार आहे. जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी मला आणखी झटावं लागणार आहे. माझी ही लढाई राजकीय सत्ता मिळवण्यासाठी कधीच नव्हती. कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून एका सामान्य कार्यकर्त्याची होती. जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो.'

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया
Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

'मला फक्त चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. आजचा कौल हा माझ्या प्रवासातील शेवट नाही. ही एक नवीन सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. मी वचन देतो की, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिन. कारण ही लढाई खूप मोठी आहे, ती आपण एकत्रितपणे जिंकू.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com