
Vasai Crime News : वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला तब्बल दीड किलोमीटर फरफटत नेलं. सुदैवाने या घटनेत वाहतूक पोलिसाला कुठलीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी कारचालकाविरोधात माणिकपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Latest Marathi News)
सावेश सिद्धिकी (वय १९ वर्ष) असे अटक केलेल्या या कारचालकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रविवारी (१२ फेब्रुवारी) सायंकाळी वसईच्या वसंत नगरी सिग्नल जवळ ही खळबळजनक घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिस (Police) हवालदार सोमनाथ चौधरी हे रविवारी सायंकाळी वसईच्या वसंत नगरी सिग्नल जवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी सर्कलवर रेड सिग्नल असताना एक कार चालक रेड सिग्नल तोडून पुढे आला.
यावेळी सोमनाथ चौधरी यांनी कारचालकाला हाताने कार बाजूला घेण्यासाठी इशारा केला. मात्र, कार चालकाने कार पुढे नेत चौधरी यांच्या अंगावरच गाडी घातली. चौधरी यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीच्या बोनेटवर चढले आणि गाडीच्या काचेच्या मधल्या जागेत पकडले. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी चालकाला कार थांबवण्यास सांगितलं. मात्र, चालकाने कार न थांबवता तशीच पुढे गोखिवराच्या दिशेने नेली.
वसई (Vasai) रेंज नाका येथे इतर गाड्या पुढे आल्याने अखेर ती कार थांबली. परंतु, यावेळी दीड कोलोमीटरच्या अंतरात चौधरी कारच्या बोनेटवरच होते. त्यावेळी चालक भरधाव वेगाने कार चालवत होता. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा सोमनाथ चौधरी हे बोनेटवरून कारचालकाला कार थांबवण्याची विनंती करत होते.
तेव्हा कारचालक हा “मरने दो साले को” अशी अरेरावीची भाषा करत होता. या घटनेनंतर चालक सावेश सिध्दीकी आणि त्याच्या सोबतचा मित्र प्रितम चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.