Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत; मुंबईत आखली मोठी रणनीती, वातावरण तापण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत; मुंबईत आखली मोठी रणनीती, वातावरण तापण्याची शक्यता
Shrikant Shinde Visit Shiv Sena Prabhadevi Shakha
Shrikant Shinde Visit Shiv Sena Prabhadevi ShakhaSaam Tv

Shrikant Shinde Visit Shiv Sena Prabhadevi Shakha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करत मविआ सरकार पाडत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. यानंतर भाजपसोबत जात शिंदे मुख्यमंत्री झाले आणि नंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळालं.

इतकं सगळं होऊनही मुंबईमधील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे.

Shrikant Shinde Visit Shiv Sena Prabhadevi Shakha
Devendra Fadnavis News: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? देवेंद्र फडणवीस यांनी दोन वाक्यात दिलं उत्तर

यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उद्या प्रभादेवी आणि दादर येथील शिवसेनेच्या शाखेला भेट देणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं तयारी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून श्रीकांत शिंदे हे आता मुंबईत सक्रिय होणार असून कार्यकर्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम ते करणार आहेत. (Latest Marathi News)

घाटकोपरमध्येही केला होता दौरा

श्रीकांत शिंदे यांनी याच महिन्यात घाटकोपर दौरा करत शिवसैनिकांची भेट घेतली होती. घाटकोपर ते शिवाजी नगरमधील विभागात शिंदे गट अधिक मजबूत करण्यासाठी श्रीकांत शिंदे स्थानिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी नागरिकांशीही चर्चा केली. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते आता मुंबईभर दौरा करतील, असं बोललं जात आहे.

Shrikant Shinde Visit Shiv Sena Prabhadevi Shakha
Odisha train Accident : काळजाच्या तुकड्यासाठी अ‍ॅम्बुलन्ससह 230 किमी अंतर कापून बालासोर गाठलं; मुलाला शवागारात पाहिलं अन्...

कल्याण डोंबिवली व दिव्याच्या मध्यभागी उभारणार भव्य आगरी कोळी वारकरी भवन

दरम्यान, डोंबिवली व दिव्याच्या मध्यभागी असलेल्या बेतवडे येथे प्रशस्त आगरी कोळी वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या बास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com