खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू, ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू

पंजाबमधील अनेक हल्ल्यांसाठी रिंडा जबाबदार होता.
खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू, ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू

>> आवेश तांदळे

नांदेड : नांदेड येथील रहिवासी असलेला खलिस्तानी दहशतवादी (Terrorist) हरविंदर सिंह रिंडा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ड्रग्सच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

नांदेडमध्ये व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती, त्यामागे रिंडाचा हात होता. सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्यांमध्ये रिंडाच्या नेटवर्कमधील काही शुटर्सचा हात होता. तसेच पंजाब इंटेलिजन्स हेड क्वार्टरवरील हल्ल्यातही त्याचा हात होता. (Latest Marathi News)

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू, ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू
Virar : संतापजनक! तरुणीची हत्या करून मृतदेहावर अत्याचार; आरोपी अटकेत

पंजाबमधील अनेक हल्ल्यांसाठी रिंडा जबाबदार होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानमध्ये राहत होता आणि भारतात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होता. रिंडाचा पाकिस्तानातील लाहोर येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

रिंडाने 2020 मध्ये पाकिस्तानी एजन्सी ISI च्या मदतीने भारत सोडला होता. तेव्हापासून तो स्लीपर सेलच्या मदतीने पंजाब, हरियाणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचे गुप्तचर विभागानं काही दिवसापूर्वी स्पष्ट केलं होतं.

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू, ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू
डीजे पार्टीनंतर भयंकर घडलं; धावत्या कारमध्ये १९ वर्षीय मॉडेलवर सामूहिक अत्याचार

रिंडावर आतापर्यंत मोक्का, अपहरण आणि खुनाचे गुन्हेही दाखल होते. रिंडा A+ स्तरावरील गुंड म्हणून ओळखला जातो. हरविंदर सिंग रिंडावर आतापर्यंत 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नांदेडमध्ये 14 आणि पंजाबमध्ये 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com