जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ यावेळी चांगलाच चर्चेत राहिला. या मतदारसंघामध्ये दुहेरी लढत झाली. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी निवडणूक लढवली. गुलबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यामध्ये जोरदार लढत झाली. पण मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सकाळच्या एक्झिट पोलनुसार, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड राहिलं. या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे पुन्हा आपला गड काबीज करणार आहेत. गुलाबराव पाटील हे या मतदारसंघाचे संभाव्य आमदार असणार आहेत. गुलबराव पाटील हे गुलाबराव देवकर यांचा दारुण पराभव करण्याची शक्यता आहे. गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होते. पण आता गुलाबराव पाटील हे पाचव्यांदा आमदारकी मिळवतील अशी चिन्हे दिसून येत आहे.
गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये होते. पण त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. या मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटील यांचे चांगले वर्चवस्व आहेत. त्यांनी या निवडणुकीमध्ये ताकद पणाला लावली होती. या मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत झाली. पालकमंत्री विरूद्ध माजी पालकमंत्री यांच्यात सामना रंगला पण आता गुलाबराव पाटील या मतदारसंघात विजयी होतील. कारण त्यांनी या मतदारसंघामध्ये चांगली विकास कामं केली आहेत. याचा फायदा त्यांना पुन्हा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.