सागर निकवाडे
नवापूर तालुक्यातील खांडबारा जिल्हा परिषद केंद्र शाळा ही परिसरातील मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत मराठी उर्दू ,गुजराती या तिन्ही भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. परंतु आता या शाळेत मुलांना पाठवण्यासाठी आई-वडिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
याचं कारण म्हणजे सदर शाळेची इमारत जीर्ण झाली असून पत्रे फुटून गेले आहेत. भिंत जीर्ण झाली आहे लाकडं खराब झाली आहेत. शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अशा अवस्थेत शाळा कधीही कोसळण्याची भीती आहे, असं नागरिकांचे म्हणणं आहे. 1938 साली तयार करण्यात आलेली खांडबारा जिल्हा परिषद शाळेला तात्काळ दुरुस्तीची गरज आहे. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला जात आहे. (latest News)
खांडबारा जिल्हा परिषद शाळेचे वर्ग अतिशय धोकादायक स्थितीत आहेत. याशिवाय शाळेचे पत्रे देखील फुटलेले आहेत, जीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी जीव मुठीत घेऊन येथे येत आहेत.
शाळेची भिंत देखील कधी पडेल आणि मोठी दुर्घटना होईला याचा नेम नाही. त्यामुळे शाळेची भिंत पडून जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार प्रशासन राहील, अशी प्रतिक्रिया सरपंच अविनाश गावित यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.