अग्निपथच्या विरोधात लोणावळा काँग्रेसचे धरणे

अग्निपथच्या विरोधात लोणावळा काँग्रेसचे धरणे
Congress
CongressSaam tv
Published On

मावळ : अग्निपथच्या विरोधात लोणावळा काँग्रेसचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. केंद्रातील मोदी सरकारने सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून अग्निपथ नोकर भरती योजना आणली आहे. या योजनेमुळे युवकांचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप करत काँग्रेस (Congress) पक्षाने देशभरात केंद्र सरकारच्या विरोध धरणे आंदोलन सुरु केले आहे. (maval news Lonavla Congress protest against Agneepath)

देशभरात सुरू असलेल्‍या आंदोलनाला पाठिंबा देत लोणावळा (Lonavala) शहरात काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. फक्त चार वर्ष नोकरी करायची आणि त्यांना अग्निविर म्हणून घोषित करायचे तीस हजार रुपये महिन्याला पगार द्यायचा त्यानंतर पंच्याहत्तर टक्के लोकांना परत नोकरीतून (Maval) मुक्त करायचे. त्यामुळे युवकांना या अग्निपथ योजनेतून नुकसान होणार आहे. त्यामुळे देशात युवकांच्या माध्यमातून हिंसक आंदोलन केले जात आहे. मात्र मावळमध्ये गांधीगिरी पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात येत असल्‍याचे मत निखिल कविषकर यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com