Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Maharashtra Assembly Election Results 2024 LIVE: महाराष्ट्रातील पहिले दहा निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहेत. आदिती तटकरे, गोगावले यांचा विजय झालाय.
Maharashtra vidhan Sabha Election
Maharashtra vidhan Sabha Election ResultSaam TV
Published On

Maharashtra Vidhan Sabha Election Results : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार, हे जवळपास निश्चित झालेय. महायुतीनं २२० जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला घवघवीत यश मिळालेय. भाजपने १२६,शिंदेंची सेना ५५ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ४० जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे मविआला जोरदार धक्का बसलाय. मविआला फक्त ४९ जागांवर आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. काँग्रेस २०, ठाकरेंची शिवसेना १७ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १२ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात धक्कादायक निकाल लागले आहेत, आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर काही निकाल जाहीर झाले आहेत.

भिवंडी ग्रामीण BHIWANDI RURAL Assembly Constituency Result -

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शांताराम मोरे यांनी विजय मिळवला आहे. मोरे यांनी ठाकरेंच्या गहतोल अंबो यांचा ५७ हजार ९६२ मतांनी पराभव केला. मोरे यांना 127205 मते मिळाली तर अंबे यांना 69243 मते मिळाली.

पालघर मतदारसंघ PALGHAR Assembly Constituency Result -

पालघरमध्ये राजेंद्र गावित यांनी ४० हजार ३३७ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी ठाकरेंच्या जयंद्र दुबळा यांचा पराभव केला. गावित यांना 112894 इतकी मते मिळाली.

श्रीवर्धन मतदारसंघ SHRIVARDHAN Assembly Constituency Result -

श्रीवर्धवन मतदारसंघातून आदिती तटकरे यांनी ८२ हजार ७९८ मतांनी विजय मिळवलाय. आदिती तटकरे यांना 116050 मते मिळाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल नावगाने यांचा पराभव केला.

निफाड, NIPHAD Assembly Constituency Result -

निफाडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला आहे. अनिल कदम यांचा २९ हजार २३९ मतांनी पराभव झाला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिलीपराव बनकर यांचा विजय झाला, त्यांना १२०२५३ मते मिळाली.

घाटकोपर-पूर्व GHATKOPAR EAST Assembly Constituency Result -

घाटकोपर-पूर्व मतदारसंघात भाजपच्या पराग शाह यांनी ३४ हजार ९९९ मतांनी विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या राखी जाधव यांचा पराभव केला. राखी जाधव यांना ५०३८९ मते मिळाली.

वडाळा मतदारसंघ WADALA Assembly Constituency Result -

भाजपच्या कालिदास कोळंबकर यांनी नवव्यादा विजयी गुलला उधळला. कोळंबकर यांनी २४ हजार ९७३ मतांनी विजय मिळवला. ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांचा त्यांनी पराभव केला. श्रद्धा जाधव यांना ४१ हजार ८२७ मते मिळाली.

माढा मतदारसंघ MADHA Assembly Constituency Result -

माढ्यामध्ये शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. माढ्यात तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये पाटील यांनी बाजी मारली. अपक्ष रणजीत शिंदे यांचा 30621 मतांनी पराभव झाला. अभिजित पाटील यांना 136559 इतकी मते मिळाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मिनलताई साठे यांना फक्त 13381 इतकी मते मिळाली.

सातारा मतदारसंघ SATARA Assembly Constituency Result -

साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठा विजय मिळवलाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल १ लाख ४२ हजार १२४ मतांनी विजय मिळवलय. ठाकरेंच्या अमित कदम यांना फक्त ३४ हजार ७२५ मते मिळाली आहेत.

कणकवली - KANKAVLI Assembly Constituency Result -

कणकवलीमधून नितेश राणे पुन्हा एकदा आमदार झाले आहेत. नितेश राणे यांनी 57601 मतांनी विजय मिळवला आहे. नितेश राणे यांना १ लाख ७ हजार १७४ मते मिळाली आहेत. संदेश पारकर यांना 49573 मते मिळाली.

महाड विधानसभा मतदारसंघ MAHAD Assembly Constituency

महाडचा गड राखण्यात भरत गोगावले यांना यश आले आहे. भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा २६ हजार २१० मतांनी पराभव केला. भरत गोगावले यांना 117442 मते मिळाली.

जयंत पाटील यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. शरद पवार गटाच्या समरजीत घाटगे यांचा पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com