Winning Candidates Of NCP Ajit Pawar Group, Maharashtra Vidhansabha Result: विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. या मतदानानंतर आज (२३ नोव्हेंबर) मतमोजणी प्रक्रिया पार पडली. ही निवडणुक अतिशय महत्वाची मानली जात होती.
कारण पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमनेसामने येणार होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने ५२ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ४१ उमेदवारांनी मैदान मारत विजयाचा गुलाल उधळला आहे.
तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील १० आमदारांना विजय मिळवता आला आहे. यादरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागून होतं. कारण या मतदार संघातून काका पुतण्याची लढत रंगणार होती.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार मैदानात होते. दरम्यान या निवडणुकीत युगेंद्र पवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अजित पवारांनी आपला गड राखत पुन्हा एकदा बारामतीचं मैदान मारलं.
राष्ट्रवादीच्या विजयी आमदारांची यादी
एकूण ४१
१) अमळनेर/ अनिल पाटील
२) अमरावती शहर / सुलभा खोडके
३) अर्जुनी-मोरगाव / राजकुमार बडोले
४) अहेरी / धर्मराव बाबा अत्राम
५) पुसद / इंद्रनील नाईक
६) प्रतापराव चिखलीकर / लोहा-कंधार
७) वसमत / राजू नवघरे
८) पाथरी / राजेश विटेकर
९) कळवण / नितीन पवार
१०) शिरूर / द्यानेश्वर कटके
११) इंदापूर / दत्ता मामा भरणे
१२) बारामती / अजित पवार
१३) येवला / छगन भुजबळ
१४) सिन्नर / माणिकराव कोकाटे
१५) निफाड / दिलीप बनकर
१६) दिंडोरी / नरहरी झिरवळ
१७) देवळाली / सरोज अहिरे
१८) पारनेर / काशिनाथ दाते
१९) अकोले / किरण लहामटे
२०) इगतपुरी / हिरामण खोसकर
२१) शहापूर / दौलत दरोडा
२२) अणुशक्ती नगर / सना मलिक
२३) श्रीवर्धन / अदिती तटकरे
२४) आंबेगाव / दिलीप वळसे पाटील
२५) भोर / शंकर मांडेकर
२६) मावळ / सुनील शेळके
२७) पिंपरी / अण्णा बनसोडे
२८) हडपसर / चेतन तुपे
२९) कोपरगाव / आशुतोष काळे
३०) अहमदनगर शहर / संग्राम जगताप
३१) गेवराई / विजयसिंह पंडित
३२) माजलगाव / प्रकाश सोलंके
३३) परळी / धनंजय मुंडे
३४) अहमदपूर-चाकूर / बाबासाहेब पाटील
३५) उदगीर / संजय बनसोडे
३६) फलटण / सचिन पाटील
३७) वाई / मकरंद पाटील
३८) चिपळूण / शेखर निकम
३९) कागल / हसन मुश्रीफ
४०) तुमसर / राजू कारेमोरे
४१) सिंदखेड राजा / मनोज कायंदे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.